DOWNLOAD BOOKS

Home - Download Books

Books Description

आदिवासी महादेवकोळी आणि ठाकर यांच्या बोलीभाषेत लिहिलेल्या ‘डांगाणी’ या सामाजिक कादंबरीने डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या कादंबरीलेखनाला 1985 मध्ये सुरुवात झाली आणि पाठोपाठ 1986 मध्ये, आदिवासी महादेवकोळी गोविंद खाडे यांनी कॅप्टन माकिनटोश या ब्रिटिश सेनानीशी केलेल्या, रत्नगडावरील (आजचा भंडारदरा डॅम परिसर) 1827 ते 1835 या काळातील संघर्षावर आधारित, आदिवासींचा भारतीय स्वातंत्र्यातील सहभाग यावरील ऐतिहासिक ‘अहिनकुल’ कादंबरी आली. त्यानंतर ‘काळ साद घाली’, ‘वावटळ’, ‘भेद,’ ‘मातंगी’, ‘क्षयवटाच्या पारंब्या’, ‘सत्यनारायण थापाडे पाटील’, ‘परवेडा’, ‘अगस्त्य’ आणि ‘नारद’ या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. कादंबरीलेखनात सर्व प्रवाह, सर्व लेखनप्रकार हाताळले आहेत. या सर्व कादंबर्‍यांवर समीक्षा, संशोधन स्वरूपात चर्चा झाली.

Dr. Sahasrabuddhe Anil started his novel writing with the novel 'Dangani' which is written in Marathi tribal dialect of Mahadeo Kilo & Thakar in 1985. Soon after he wrote a Historical novel 'Ahinakul'. It describe the Battle of Freedom fighter Govind Khade with Cap. Makintosh in 1827 to 1835; which can be known as the first fight for Barat freedom. Then the wrote 'Kal Sad Ghali', 'Vavatal', 'Bhed', 'Matangi', 'Kshaywatachya Parambya', ;Satyanarayan Thapade Patil', 'Parveda', 'Augustyua' & 'Narada' in successtion. He contrubutied in all stream and types of Marathi Novel. Agastya is translated in Kannad, English.

(अनंत दाशरथे, परिमल प्रकाशन, औरंगाबाद, प्रथम आवृत्ती जानेवारी 1985) नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी, ठाकर यांचे समग्र सामाजिक जीवन. निसर्ग व संस्कृती वैशिष्ट्यांसह स्पष्ट करणारी व त्याद्वारा आदिवासींच्या समस्या मांडणारी सामाजिक कादंबरी. या कादंबरीची विपूल चर्चा व समीक्षा झाली. दशकातील कादंबर्‍यात वेगळी वाट चोखाळणारी कादंबरी म्हणून जागतिक मराठी परिषदेच्या निमित्ताने उल्लेख. डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी रेडिओवर व्याख्याने दिली. श्री. रोंगटे यांनी पुणे विद्यापीठात या कादंबरीचे संशोधन करून एम्. फिल् पदवी 1998 मध्ये प्राप्त केली. आदिवासींच्या बोलीभाषेत लिहिलेली ही कादंबरी. वाङ्मयेतिहासात आदिवासी साहित्य समालोचनात डॉ. तुमराम यांनी विशेष उल्लेख केला आहे.

Aanant Dasharathe, Parimal Publication, Aurangabad 1985. The life style of The Scheduled Tribe Mahadev Koli & Thakar in Akole Taluka, Dist. Ahmednagar is the subject of the Novel. The Novel is narrated in the trible dialect, It discusses, all the problems in their life through the story. The Novel had been discussed on the Radio in the serial of lectures by Dr. Bhimrao Kulkarni the great Critic. It is found as the outstanding Novel in ten years survey by Jagatik Marathi Parishad. The Thesis, for M.Phil by Shri Rongate (now the Professer in Marathi, University of Pune) in University of Pune is awarded.

(अद्भुत कादंबरीमधून एकाच अंकात स्वतंत्रपणे प्रसिद्ध. फेब्रुवारी 1986) अस्मिता प्रकाशन, 458/2, सदाशिव पेठ, पुणे-30) 1993 नंतरचा भारतीय सत्तासंघर्ष कोणत्या स्वरूपाचा असेल या विषयाला वाहिलेली राजकीय कादंबरी.

Adbhut Kadambari. Asmita Prakashan, Pune 1996. The foretelling about the political affairs after 1993 is narrated in this novel through the story.

(अनंत दाशरथे, परिमल प्रकाशन, खडकेश्वर, औरंगाबाद, प्रथम आवृत्ती एप्रिल 1986) गोविंद खाडे, रामजी भांगरे आणि रामा किरवा या आदिवासी पुढार्‍यांनी पेशवाईच्या अस्तानंतर त्वरित इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव (स्वातंत्र्य लढा) 1827 ते 1835 मध्ये कॅप्टन सीक्स आणि कॅप्टन मॉकिन टोश यांच्याशी दिलेला हा लढा. आज भंडारदरा तलावाच्या जागेवर अखेरचा लढा. रत्नगडावरून एका तोफेच्या बळावर पंधरा दिवस तुंबळ लढा दिला. याचे अवशेष ऐतिहासिक वस्तु संग्रहालय, नगर येथे आहेत. या स्वातंत्र्यलढ्याचा रोमांचकारी इतिहास कादंबरीरूपात वर्णन केला आहे. प्रथम ही कादंबरी 1985 मध्ये ग. वा. बेहेरे ‘अद्भुत कादंबरी’ या संपादित मासिकात प्रसिद्ध झाली होती. वाङ्मयेतिहासात डॉ. विनायक तुमराम यांनी आदिवासी साहित्य दालनात कादंबरीचा विशेष उल्लेख केला आहे.

Aanant Dasharathe, Parimal Publication, Aurangabad 1986. The Story of Freedom War by trible leaders Govind Khade, Ramaji Bhangare & Rama Kirva against British Ruler. Captain Six & Captain Makintosh, is narrated in the novel. They fought from Ratnagad with only one Tof gun for fifteen days. The battle field was the place where the Willson Dam is situated. The novel was previously published in the magazine 'Adbhut Kadambari' Asmita Publication. The thesis for M.Phil. is written on it.

(अनघा महाजन, राजेंद्र पब्लिकेशन, 7, सुधांशु, वैकुंठ रस्ता, 1445/5, नवीपेठ, पुणे/ए-9, श्री दत्तप्रसाद, रवि इंडस्ट्री कंपाऊंडजवळ, एक्स्प्रेस हायवे, ठाणे, प्र.आ. 1987. प्रथम याच प्रकाशनाने ‘अमरेंद्र’ या मासिकात कादंबरी प्रसिद्ध केली होती.) आदिवासी समाजातील शिकलेले हुशार तरुण औद्योगिक क्षेत्रात घुसून प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करू लागले तर कोणत्या प्रकारचा सामाजिक व आर्थिक संघर्ष होऊ शकतो, या विषयावरील सामाजिक कादंबरी. वाङ्मयेतिहासात उल्लेख आहे.

Rajendra Publication, Pune/Thane 1987 - Previously it is published in the Magazin 'Amarendra'. The Scholar and ambitious young generation from scheduled tribe, is trying to enter and establish in Industrial Sector. In such situation. In that case what can be the Social & Economical problems they can be to face, is the subject in the novel.

(अनघा महाजन, राजेंद्र पब्लिकेशन, 7, सुधांशु, वैकुंठ रस्ता, 1445/5, नवीपेठ, पुणे/ए-9, श्री दत्तप्रसाद, रवि इंडस्ट्री कंपाऊंडजवळ, एक्स्प्रेस हायवे, ठाणे, प्र.आ. 1987. प्रथम याच प्रकाशनाने ‘अमरेंद्र’ या मासिकात कादंबरी प्रसिद्ध केली होती.)अहमदनगर जिल्हा साखर कारखानदारीचा आहे. दरवर्षी अहमदनगर व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू जमिनीतील शेतकरी, शेतमजूर, वंजारा लोक ऊसतोडे म्हणून येतात. असाह्य अवस्थेत अपरिहार्यतेने जगत असताना त्यांची वाताहत होते. अनेक मुले अनाथ होतात. गांजलेल्या या समूहाची कहाणी या कादंबरीत एका काल्पनिक कथानकाच्याद्वारे वर्णिली आहे. नगर जिल्ह्यात ख्रिश्‍चन मिशनरींचे काम मोठे आहे. महाराष्ट्रात अनेक केंद्रे आहेत. उपेक्षित पिडीतांच्यासाठी उभारलेल्या सेवाकार्याचा परिणाम काय होऊ शकतो, हेही कादंबरीच्या उपकथानकात आले आहे. नगर जिल्ह्याचे बदलते रूप व संदर्भ कादंबरीत आहे.

Rajendra Publication, Pune/Thane 1987. Ahmednagar district is known for Sugar Industries. Many many people from the group of farm worker & nomads from draught area of Marathwada came here to work as Sugarcane Cutters. All the way they are helpless and very poor. Many children become orphan in many ways. Many families almost ruined by the poverty. This affected life of the people is the subject of this novel. Christian Missionaries are doing mission work; try to help them with the publicity of the Christanity. The novel shows the changing picture of the district & of the Sugar belt.

(मोरया प्रकाशन, डोंबिवली/पुणे. प्र.आ. 1992. ‘माणूस’ साप्ताहिकात प्रजासत्ताकदिन विशेषांकात श्री. ग. माजगावकर यांनी 1988 साली प्रथम प्रसिद्ध केली होती.) मातंग समाजातील मित्रांच्या सहवासाच्या अनुभवातून (विशेषतः अकोले येथील) एका सत्यकथेच्या, काडीचा आधार घेऊन समग्र मातंग समाजाचा अभ्यास घडला. विश्व हिंदू परिषदेचे नगर जिल्ह्यात व अन्यत्र घडणारे शुद्धीकरणाचे कार्य पाहिले. ‘धर्मभास्कर’ या मासिकात वाचले. त्यातून ही सत्यकथेवर आधारित संपूर्ण काल्पनिक सामाजिक कादंबरी झाली. मातंग समाजाचे पारंपरिक जीवन व समस्या राष्ट्रवादी भूमिकेतून या कादंबरीत चर्चिल्या आहेत.

Moraya Publication Dombivali/Pune 1988. The Novel 'Matangi' is based on a true story, Experienced by the friends at shedual cast Matanga's. Cultural Organisation The Vishwa Hindu Parishad's work and the reports from the magazine Dharmbhaskar are also referred in this novel. The Traditional life & the problems of Matang cast people are discussed in view of Nationalism.

(सौ. पुष्पा आनंदा हांडे, राहुल प्रकाशन, 14, टेंबेपाडा, भांडुप, मुंबई-78, प्र.आ. 1992).अकोले या एकाच गावातील लोककथांवर आधारित अधरात्मे, गुप्तधन, नागयोनी, सिद्धसाधकांचे शाप यावर आधारलेली संपूर्ण काल्पनिक, अद्भुत कादंबरी. संज्ञाप्रवाह, आदिबंध यांचा वापर यात विपुल प्रमाणात असून, मानसशास्त्रीय, लोकसाहित्यशास्त्रीय परिमाण या कादंबरीस प्राप्त झाले आहे. या कादंबरीवर एम्.फिल. साठी प्रबंधिका लिहिली गेली.

* Rahul Publication Mumbai 1992. The Thesis is written on the novel for M.Phil. (Folk-Stories based somewhat mistic & mythological miraculaous Novel) * The Story of the novel is based on the Folk stories in a village. After death lives, underground wealth, the Kobra race, the cursing from the Prists, Devotee, Sidha etc. characters & stream of consciousness, archetypes are used in this novel on large scale. The novel can be criticize sociological & Folktypal approach to it.

(मोरया प्रकाशन, दिलीप महाजन, संपदा शास्त्रीनगर, डोंबिवली पश्‍चिम, नगरपालिका दवाखान्याजवळ, प्र.आ. 1993).सत्यनारायण थापाडे पाटील हे एक मानसपात्र कल्पून सामाजिक व राजकीय विसंगती, विकृती, घडामोडी, उपरोध, उपहास यांच्या स्वरूपात विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न अनेक कथांमधून झाला आहे. या सत्यनारायण थापाड्यांच्या कथा तरुण भारत, सार्वमत, गतिपत्र, देशदूत आदि अनेक नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झाल्या. त्यात आणखी विशिष्ट कथांची भर घालून प्रयोगात्म पद्धतीने लीळा चरित्रात्मक स्वरूपात सत्यनारायण थापाड्यांचे जीवन चरित्र सांगणारी एक कादंबरी आकारली आहे. प्रा. द. मा. मिरासदार, आनंद यादव आदींनी तर यावर चर्चा केलीच. परंतु महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तरुण भारत आदींमधून यावर समीक्षा झाली. चिं. वि. जोशी, बाळ गाडगीळ यांच्या लेखनाशी तुलनात्मकतेने विचारही झाला. श्री. गाडे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एम्.फिल केले.

(Humorous deeds based autobigrafical Novel) Moraya Publication Dombivali/Pune 1993- An imaginary character Satyanarayan Thapade Patil is designed in this humorous deeds based autobiographical novel. With the help of the deeds humorously and satirically the novel uncovered. Social & Political contradictory affair. Novel is the series of the humourous and satirical deeds of Satyanarayan Thapade Patil. There was a large scale discussion occured in the papers & magazines. The Thesis was written for the M.Phill.

(प्रीती प्रकाशन, पुणे, प्र.आ. 2002.)नाट्यछटेच्या एकेरी तंत्राने आणि संज्ञाप्रवाही संवेद्यतेने आविष्कृत झालेली रंजक, प्रायोगिक कादंबरी. डॉ. कोत्तापल्ले यांची या प्रयोगास प्रस्तावना आहे.

Priti Publication 2002. One sided articulation/orational style is used with stream of consciousness to design the experimental novel. Preface is written by Dr. Kottapalle.

(पद्मगंधा प्रकाशन, पुणे 2010)अगस्त्य ही 350 पृष्ठांची, अगस्त्य ऋषींविषयीची पौराणिक कादंबरी स्वरूपातील कादंबरी. अगस्त्यांचा साक्षात्कार झाल्यानंतर अगस्त्यांच्या आज्ञेने डॉ. सहस्रबुद्धे यांचेकडून ‘अगस्त्य महात्म्य’ हा ओवीग्रंथ लिहिला गेला. पुराण नायकांविषयी संशोधनात्मक लेखन करणे शक्य नसते. तसेच साक्षात्कार यासारख्या अनुभवांना भौतिक पुरावे नसतात. हा विचार करून डॉ. सहस्रबुद्धे यांनी कादंबरी हा कल्पनारंजक साहित्यप्रकार निवडला आहे. अतिशय श्रद्धेने व वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत, अगस्ती ऋषींविषयी अनेक ग्रंथात आणि लोककथांच्या स्वरूपात आलेल्या कथा यांच्यातून पुराणावशेष एकत्रित करीत महर्षी अगस्त्यांच्या साक्षात्कारानुसार संदर्भ घेत या कादंबरीचे लेखन केले आहे. ऋषीकार्याचे भौतिक महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, अगस्ती ऋषीमहात्म्य सर्वांपर्यत जावे हा या लेखनामागील स्पष्ट हेतू आहे, असे डॉ. सहस्रबुद्धे सांगतात.

(The novel based on mythical stories of Saga Agastya) Padmagandha Publication, Pune 2010. 'Agastya' is the novel based on mythical stories of saga Agastya Rishi. Agasti Rishi visualized himself in front of Dr. Sahasrabuddhe and asked or ordered him to write biographical story of Agastya. Dr. Sahasrabuddhe says that he experienced it, ancient mythical stories are the folk-stories as to be taken. The stories cannot be inpresent. That's why the novel writing is used as the form of literature. The full faith in Agastya and Vedas, Puranas Ramayan, Mahabharat are taken as the supporting matter to write the novel. The Novel is written to Obey The Rishi Agastya and to tell his important deeds to people.

पू. गुरुवर्य हरिभाऊ फडके यांच्या आज्ञेनुसार अनिल सहस्रबुद्धे यांनी संतसाहित्याच्या विशेष अभ्यासाला सुरुवात केली. ‘ज्ञानेश्वरीतील साहित्यविचार’ (1991) या ज्ञानेश्वरी ग्रंथाव रील स्वतंत्र साहित्यशास्त्रविषयक ग्रंथाने ही सुरुवात झाली. या ग्रंथाला ज्ञानेश्वरीलेखन सप्तशताब्दी वर्षानिमित्त 1992 साली महाराष्ट्रातील निवडक नऊ अशा ज्ञानेश्वरीवर स्वतंत्र लेखन करणार्‍या विद्वानांची निवड करून, कांची कामकोटी पीठाच्या जगद‍्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी विद्वद् पुरस्कार देऊन; डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांना गौरविले. पुढे ‘लोकी अलौकिक तुकाराम’, ‘स्वामी त्र्यंबकराज कृत सार्थ बालबोध’, ‘श्री संत शेख महंमद महाराज कृत योगसंग्रामचे सार्थ योगसंग्राम’, ‘संतांचिया संगे’, ‘कैवल्यगंध’, ‘श्री संत शेख महंमद महाराज यांची सार्थ अभंगवाणी’, ‘संत शेख महंमद महाराज (यांचे चरित्र)’ या ग्रंथांचे लेखन झाले. ‘शोध पांडुरंगाचा’ हा संशोधन प्रकल्प झाला.

Shri Haribhau Phadake, the honourable teacher of Dr. Sahasrabuddhe asked him to write on Shri Dyaneshwari. Following him Dr. Anil Sahasrabuddhe started to study the sant literature. He wrote the Book 'Dyaneshwaritil Sahityvichar' in 1991. The book was awarded with Vidwat Puraskar by the Jagadguru Shri Shankaracharya of Kanchi Kamkoti Pith Shri Jayendra Saraswati, on the occsion of Dyaneshwari Lekhan Sapta Shatabdi Sohala. Shri Shankarcharya selected nine them scholars from Marashtra and Dr. Sahasrabuddhe was one of Further. 'Loki Aloukik Tukaram', 'Sarth Balabodha written by Swami Trambakraj', 'Sarth Yogasangram by Shaikh Mahamad', 'Santanchiya Sange, 'Kalvalyagandha', 'Shri Saint Shaikh Mahamad Maharaj Yanchi Sarth Abhangvani', 'Biography of Saint Shaikh Mahamad Maharaj' etc. are published. He completed the project of 'Shodha Pandurang.'

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे प्र.आ. 1991, द्वि.आ. 2005) ‘श्री ज्ञानेश्वरी’मधील साहित्यविचारविषयक निवडक ओव्यांच्या आधारे श्रीसंत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला परतत्त्वस्पर्शवाद, साहित्याचे स्वरूप, प्रयोजने, आस्वादप्रक्रिया, निर्मितीप्रक्रिया इ. संबंधातील विचार सोदाहरण चर्चिला आहे. या ग्रंथास कांची कामकोटी पीठाच्या श्रीमद् जगद‍्गुरू शंकराचार्य यांचेकडून विद्वत् पुरस्कार - अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले. (दि. 14.11.91)

Dastane Ramchandra And Co., Pune First Edition in 1991, Second Edition in 2005. (Phylosophy of literature in Dnyaneshwari) Jagatguru Shri Shankaracharya of Kanchi Koti Pitha awarded Dr. Sahasrabuddle by 'Vidvat Puraskar' in selected nine scholars in Marashtra. (Best Scholar award)

श्री संत तुकाराम महाराज ः व्यक्ति आणि वाङ्मय या स्वरूपातील संशोधनात्मक ग्रंथ. श्री संत तुकाराम अध्यासन, पुणे विद्यापीठ पुरस्कृत.

(To the Press) The all round Critical study of the Personality & the literature of Sant Tukaram. Shri Sant Tukaram Chair, Pune University recomended book.

श्री स्वामी समर्थ राजयोगी श्री त्र्यंबकमहाराजकृत ‘बालबोध’ ‘‘श्रीमद् बालबोध - भावानुवादासह’’ श्री स्वामी समर्थ राजयोगी त्र्यंबक महाराज यांनी लिहिलेला ‘बालावबोध’ अर्थात ‘बोलबोध’- अज्ञ लोकांना बोध, भावानुवादित केला आहे. या ग्रंथात गुरु-शिष्य संवाद स्वरूपात संपूर्ण राजयोग शास्त्र मंडित केले आहे. सिद्ध संप्रदायाचा हा प्रमाणित ग्रंथ होय. ग्रंथाचे योगशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन हा भावानुवाद केला आहे. पारिभाषिक शब्दांच्या यथायोग्य अर्थ स्पष्टीकरणासह हा ग्रंथ सिद्ध केला आहे. प्रकाशक - समर्थ त्र्यंबकराज स्वामी महाराज ग्रामविकास ट्रस्ट देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, प्र.आ. आषाढ शु. एकादशी शके 1935, 19/7/ 2013, पृष्ठे ए4 साईज वाईड 180, सेवा मूल्य - मनाप्रमाणे.

'Shrimad Balabodha - Bhavanuvad' Balavbodh that is Balabodh written by Shri Swami Samarth Rajyogi Tryambak Maharaj guides Yogmarg to the Sadhakas on the Rajyog Marg. The sacred volume discuss the Rajyog in the form of dialogue between the Guru and his student - that is follower. It is the text for Siddha Sampraday. Acknowledging the importance of the volumke Balbodh, it is formed in easy prose form for the common people. Publication - Samarth Swami Maharaj Gramvikas Trust, Devlali-Pravra, Tal. Rahuri, Dist. Ahmednagar. First Copy- Aashadha Shuddha Ekadashi Shake 1935, 19/07.2013, Pages- A4 Size Wide 180, Service Prize - as devotee wishes.

‘योगसंग्राम’ या ग्रंथाचे कर्ते शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर हे मराठी संतमंडळात ‘कबिराचा अवतार’ म्हणून प्रख्यात आहेत. मुस्लिम मराठी संतकवींच्या वाङ्मयातील अतिमहत्त्वाचा ‘योगसंग्राम’ हा ग्रंथ होय. योगमार्ग आणि भक्तिमार्ग या दोन्ही दृष्टींनी अभ्यासनीय ग्रंथ म्हणून; या ग्रंथाची ख्याती आहे. सार्थ स्वरूपात या ग्रंथाची उपलब्धी अभ्यासकांच्या दृष्टीने व सांप्रदायिकांच्या दृष्टीने आवश्यक होती. याचसाठी श्री शेख महंमद महाराज देवस्थान उत्सव प्रतिष्ठान व ग्रामस्थ श्रीगोंदा यांच्या संकल्पनानुसार, भावानुवादाच्या स्वरूपात पारिभाषिक शब्दांच्या स्पष्टीकरणासह ‘सार्थ योगसंग्राम’ संपादित केला आहे. प्रकाशक ः अध्यक्ष व सभासद ः श्री संत शेख महंमद महाराज देवस्थान उत्सव ट्रस्ट प्रतिष्ठान व ग्रामस्थ, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, प्र.आ. फेब्रुवारी 2015, पृष्ठ ए5 साईज 378, सेवामूल्य 260/-.

The author of 'Yogsangram', Shaikh Mahammada Baba is wellkonwn as 'Kabiracha Avatar' in Marathi saint community. The book 'Yogsangram' is very important in the literature of Muslim Marathi saint community. The book is famous to study both the path of Yog and Bhakti. It was the necessity to have it in translated form, for the followers, 'Shri Shaikh Mahammad Maharaj Devsthan Utsav Pratishthan' and villagers in Shrigonda decided to publish it. The free rendering contains adaptation of piligrims and the easy meaning of the terminology. Publisher - President and members of Shri Shaikh Mahammad Maharaj Devsthan Utsav Pratishthan and villagers, Shrigonda, Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar. First Edition- February 2015, Pages A5 Size 378, Service Prize 260/-.

(संपा.डॉ. मच्छिंद्र मालुंजकर - दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे प्र.आ. 2010 समीक्षा डॉ. अनिल सहस्रबुद्धे, प्रवक्ता- ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले.) ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘संत साहित्याची लोकबंधात्मक चिकित्सा’ या स्वरूपातील संशोधन प्रकल्प हाती घेतला. श्री ज्ञानेश्वर ते तुकडोजींपर्यंतच्या संत कवींच्या रचनांचे ह.भ.प. अशोकानंद महाराजांचे प्रवचन/कीर्तन स्वरूपात सादरीकरण आणि या सादरीकरण व रचनांची लोकबंधात्मक चिकित्सा डॉ. सहस्रबुद्धे यांनी केली. दै. समाचार या दैनिकाने समीक्षा प्रसिद्ध केली. या प्रकल्पाचे ग्रंथरूप अभंगपौर्णिमा या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक संपा.डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी प्राप्त झाले.

(Ed. Dr. Machindra Malunjkar) Dastane Ramchandra & Co., Pune 2010. Peformance by Shri Ashokanand Maharaj Kardile - Criticism Dr. Sahasrabuddhe Anil. Aanandostav Charitable Trust worked on the Project 'Abhangpournima' it is Folktypal approach to the Sant Literature - A Critical Study. The Fifteen Episodes were performed in the form of Homily/Kirtan by Ashokanand Maharaj Kardile. Dr. Sahasrabuddhe Criticised the literature and the Episodes in view of Folktyple approach to the Sant literature. The Book was awarded by Maharashtra Sahitya Parishad, Pune with Abbijat Sahitya Shreshthata Paritoshik.

(मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली 2014) संत साहित्यावरील ऐतिहासिक, तुलनात्मक, विवेचक दृष्टिकोनातून चिकित्सा. संत साहित्य विषयक ऐतिहासिक, तुलनात्मक, विवेचक दृष्टीसे आलोचना.

Criticisim of Sant Literatur with the Historical, Comparative and Criticial approach.

अवघ्या पसार्‍यात, संसार-प्रपंचाच्या यातायातीत, संमोहितपणे सुखदुःख भोग भोगणार्‍या माणसास; आपल्या मानवी देहप्राप्तीचे महानपण, निर्देशित करून; माणसातले माणूसपण आणि माणसातील देवपणाचे जागरण करणार्‍या अनेक विभूती युगायुगात प्रकट होत राहिल्या. मानवी समूहांतील ही धुरीण विभूतिमत्वे, आत्मतत्त्वाचा साक्षात्कार सर्वांना घडवित; चराचराला, एकात्मभावनेला ‘कैवल्यगंध’ पोहोचवून; जीवनाला पुरुषार्थाचे सामर्थ्य बहाल करतात. नगर जिल्ह्याच्या गोदा, कृष्णा, प्रवरा, भीमा खोर्‍यांचा पावन प्रदेश, अशा परमार्थप्रवण महात्म्यांच्या कृपाप्रसादाने परमार्थास पोचलेला आहे. या दिव्य विभूतिमत्त्वांचे स्मरण हा ग्रंथ वाचकांना घडवितो. प्रकाशक ः आनंदोत्सव प्रकाशन मंच, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदनगर, प्र.आ. 15 जुलै 2016 (आषाढी एकादशी), पृष्ठे 160, मूल्य 150/-.

The saints always stress the imortance of human body to realize the divine existance in theirselves and they guide the man to be God by his work or love for Universal beings. In every age there are such religious heroes or saints or guru who are working only for happiness of mankind. Hee, in this book, there are twenty five saint personalities in Ahmednagar District are described. Ahmednagar District is the basin of the Godavari, Pravara, Bhima and Kirshna rivers. The basin is itself a religious area. Publication - Aanandotsav Prakashan Manch, Aanandotsav Chairitable Trust, Ahmednagar, First Edition- July 15th 2016 (Aashadhi Ekadashi), Pages 160, Prize 120/-

‘चाळीसगाव डांगाण परिसर ः सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यास’, या पीएच.डी. साठीच्या प्रबंधलेखनाच्या निमित्ताने लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. या प्रबंधलेखनासाठी आदिवासी क्षेत्रात क्षेत्रीय अभ्यासाधारे लोकसाहित्याचा तीन अंगांनी अभ्यास केला. मुलभूत स्वरूपातील अभ्यासाची आवश्यकता लक्षात आली. लोकसाहित्यातील शाब्द आणि वर्तनात्मक स्वरूपातील प्रयोगसिद्ध अवस्थेचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘लोकसाहित्य विचार’ हा प्रथम ग्रंथ लिहिला. त्यानंतर लोकसाहित्य आणि मानवी जीवनाचा अन्योन्य संबंध उलगडण्याच्या ध्यासातून ‘लोकबंध’ हा लोकसाहित्य ज्ञानक्षेत्रातील सर्वंकश आणि मुलभूत प्रक्रिया उलगडणारे संशोधन घडले. या संशोधनास लोकसाहित्य संशोधन मंडळाचा संशोधन पुरस्कार प्राप्त झाला. ‘लोकसाहित्य संशोधन पद्धती’, ‘अन्नासाठी दाही दिशा’, ‘लोकसाहित्याचा अन्वयार्थ’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यासातील चकवे आणि उतारे’, ‘लोकबंधात्मक चिकित्सा’ हे लोकसाहित्यविषयक ग्रंथ झाले. ‘लोककला’ हा लोककलेविषयी संकल्पना स्पष्ट करणारा ग्रंथ झाला. मराठी विश्वकोशातील लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती ज्ञानमंडळाचा समन्वयक म्हणून कार्य घडले.

Dr. Sahasrabuddhe Anil Started the study of Folk-Lore area with the field work in Tribal area of the tribes H. Mahadeo Koli & Thakar living around the high peaks of Sahyadri the aria called 'Chalisgaon Dangan'. He was awarded Ph.D. by Pune University for the thesis - 'Chalisgaon Dangan : Cultural Litterary & Lingustic Study'. After that he studied in the faculty of folk-lore to unfold the fundamental concepts of in area. He wrote 'Loksahitya Vichar', 'Lok-Bandh', 'Loksahitya Sanshodhan Paddhati', 'Annasathi Dahi Disha', 'Loksahityacha Anwayarth', 'Loksahityacha Abhyasatil Chakave Aani Utare', 'Lokbandhatmak Chikitsa', 'Lok-Kala'. He worked for the Loksahitya Aani Lok-Sanskriti Dnyanmandal of Marathi Vishwakosh. He was awarded this research award by Loksahitya Sanshodhan Mandal for the Book Lokbandha.

सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखर रांगांचा वैशिष्ट्यपूर्ण भाग अकोले तालुक्याच्या (अ.नगर जिल्हा) पश्चिमेस आहे. डोंगरउतरणीवरील आदिवासी महादेव कोळी व आदिवासी ठाकर यांच्या सलग गावांचा वाड्यांचा असा हा भाग आहे. (पूर्वीची चाळीस गावे) आता 125 गावांचा समूह या नावाने (डांगाण) ओळखला जातो. या डांगाण भागातील लोकवाङ्मयाचे अर्थात लोककथा, लोकगीते, लोकसंस्कृती इ.च्या संकलन, संपादन या सह अभ्यासाचा हा प्रयत्न आहे. क्षेत्रीय अभ्यासाच्या दृष्टीने याचे विशेष महत्त्व आहे. प्रकाशक ः आनंदोत्सव प्रकाशन मंच, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदनगर, प्र.आ. 1 डिसेंबर 2013, पृष्ठे 227, मूल्य 200/-.

Chalisgaon Dangani is a field which is situated in the topmost peaks of Harishchandra and Kalsubai Range. Thee live the tribes Mahaveo Koli and Thakar thickly in a group of one twenty five villages on the steep rocks. In mediveal age it was the pocket of forty villages on steep rocks of Sahyadri. That's why it is called Chalisgaon Dangan. Here it is the collection of Folk-Lore of tribes in this area. It is an important field work study for Ph.D. It is the first volume. Publication- Aanandotsav Prakashan Manch, Aanandotsav Chairitable Trust, Ahmednagar, First Edition- December 1st 2013, Prize 200/-.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील पश्चिम भाग सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरांचा प्रदेश चाळीसगाव डांगाणी म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील आदिवासी महादेव कोळी व आदिवासी ठाकर यांच्या क्षेत्रीय अभ्यासावर आधारित, लोकसाहित्य व संस्कृती व भाषा या संदर्भाने केलेली सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिक चर्चो या ग्रंथात आहे. ‘चाळीसगाव डांगाण परिसर ः सांस्कृतिक, वाङ्मय आणि भाषिक अभ्यास’ असा प्रबंध 1979-80 मध्ये पुणे विद्यापीठाने पीएच.डी.साठी पारित केला. त्यावर आधारित हा द्वितीय खंड आहे. प्रकाशक ः आनंदोत्सव प्रकाशन मंच, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदनगर, प्र.आ. 1 डिसेंबर 2013, पृष्ठे 299, मूल्य 300/-.

THISIS - Chalisgaon Dangani (Novel 1) Lokwangmaya & (Novel 2) Lokbandhatmak Aaklan 1980 Published by Anantostav Prakashan Manch in 2013.

(सविता प्रकाशन, मंगलप्रभा 109 एन/5 दक्षिण, सिडको, औरंगाबाद, प्र.आ. 1990) लोकसाहित्याचे स्वरूप, प्रयोजने, चिरंतनत्व, पर्यायमीमांसा, आस्वादता, कलाविष्कार इ. संबंधात संशोधनात्मक चर्चा केली आहे. या ग्रंथास ग्रंथ प्रकाशनार्थ, साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्याचे अनुदान प्राप्त झाले. पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर ‘लोकसाहित्य’ अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून 1991 पासून स्वीकृत.

Savita Prakashan, Aurangabad, First Edi. 1990 Concept, Forms, Lastlongerness, Examples, Delightful Experience, Art & Expressions etc. are disscussed in the book. The Sahitya Sanskriti Mandal awarded grants for it's publication. The book is recognised as the reference for P. G.

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, 830, सदाशिव पेठ, पुणे-30, प्र.आ. 1995, नितीन प्रकाशन, बुधवार पेठ, पुणे, द्वि.आ. 2012) ‘लोकबंध’ संपूर्ण नवी संकल्पना लोकसाहित्य अभ्यासक्षेत्रात मांडून लोकतत्त्व, आदिबंध, कल्पनाबंध, भावबंध, आवर्तक कल्पनाबंध आदि सर्व कल्पनांना समावेशक, लोकधारणेच्या दृष्टीने मूलभूत विचार मांडून संपूर्ण तात्त्विक चर्चा केली आहे. ‘लोकबंधात्मक समीक्षा ः संकल्पना व प्रयोग’ या परिशिष्टाचा समावेश केला आहे. मुंबई व पुणे विद्यापीठात या विषयावर स्वतंत्र व्याख्याने आयोजित झाली. पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून स्वीकृती दिली. लोककला साहित्य संमेलन, नाशिक, येथे संमेलनात लोकबंधात्मक समीक्षा-संकल्पना व प्रयोग या निबंधाचे वाचन झाले. लोकसाहित्य संशोधन मंडळाचा ‘संशोधन पुरस्कार’ प्राप्त.

Dastane Ramchandra & Co. Pune First Ed. 1995 & Second Ed. Nitin Publication, Pune in 2012. Lokbandha is the new concept introduced by Dr. Sahasrabuddhe in the field of Fook-lore, faculty. It discussed the Folk-Elements such as Archetype, Motifs, feeling types & frequent motifs & Lokbandha - Folk-type. Concept of Folktypal/Folk Elemental Criticism & its Example is given in the book in the appendix. The lectures were arranged in the Universities on this topic. It is recognised as the reference book for P. G. Classes. Lok-Sahitya Sanshodhan Mandal awarded 'Sanshodhan Puraskar' Research Award for the book in 2000.

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, 830, सदाशिव पेठ, पुणे-30, प्र.आ. 1997, नितीन प्रकाशन, बुधवार पेठ, पुणे, द्वि.आ. 2012) मुंबई विद्यापीठ व मराठी संशोधन पत्रिका यांच्या विद्यमाने अ. का. प्रियोळकर व्याख्यानमाला आयोजित केली. या व्याख्यानमालेत ‘लोकसाहित्य संशोधन पद्धती’ हा शोधनिबंध वाचला. त्याचे ग्रंथरूप प्रकाशित झाले. लोकसाहित्याच्या क्षेत्रीय, स्तरीय व अन्य संशोधन पद्धतींची शास्त्रीय चर्चा, मिथक-मिमांसा आणि लोकबंधात्मक समीक्षा असे विषय यात चर्चिले आहेत. पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांनी संशोधनासाठी संदर्भग्रंथ म्हणून स्वीकृत केले आहे.

Dastane Ramchandra & Co. Pune First Ed. 1997 & Nitin Publication, Pune Second Ed. 2012. University of Mumbai and Marathi Sanshodhan Patrika jointly arranged a lecture serial. The Research Paper on Loksahitya Sanshodhan Paddhati was presented there. The book is based on the research paper-disscussing the Methods of research by fieldwork - in the area selected for research, Social Status or other research methods. The discussion on Mythology and The Folk typal Criticism is also in it. The book is recognised as the reference book to P. G. in the Universities.

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, 830, सदाशिव पेठ, पुणे-30, प्र.आ. 2002) भटके विमुक्त या ना त्या प्रकारे अन्नासाठी दाही दिशा आजही भटकंती करीत आहेत. त्यांना बदलत्या भौतिक परिस्थितीत, शिक्षण प्रक्रियेतून सर्वांबरोबर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुकुल शिक्षण, मुलोद्योग शिक्षणविषयक चिंतनासह वैचारिक व माहितीपर लेख.

Dastane Ramchandra And Co., Pune 2002. The lifestyle of nomads is discussed in this book.

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, 830, सदाशिव पेठ, पुणे-30, प्र.आ. 2003) लोकगीते, म्हणी व वाक्प्रचार वर्तमानातील जीवनाशी अनुबंध लावीतच प्रकट होत असते. म्हणूनच लोकसाहित्य नित्य वर्तमान असते. अन्वयार्थक लेख व चाळीसगाव डांगाण परिसरातील क्षेत्रीय अभ्यासातील गीतांचे विवेचन. या पुस्तकात आहे.

Dastane Ramchandra And Co., Pune 2003. The book discusses, how we can interpret the expression of the whole lifestyle of the people with the help of the folklore. The Folklore is the present lifestyle of the people. It is discussed here.

(दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, 830, सदाशिव पेठ, पुणे-30, प्र.आ. 2011) लोकसाहित्याच्या अभ्यासातील संज्ञा, संकल्पना याविषयी खंडन मंडनात्मक विचारमंथन. मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासाचे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मराठी भाषेला योगदान यासह.

Loksahityachaya Abhyasatil Chakve Aani Utare : Dastane Ramchandra And Co., Pune 2011. The ambiguities and reddles in the study of the Folklore. It discusses or answers how to avoid the ambiguities and riddles in the studies of Folklore.

(नितीन प्रकाशन, बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौक, पुणे प्र.आ. जुलै 2012.) या ग्रंथात लोकबंधात्म दृष्टीने ललित साहित्याची व लोकजीवनाची चिकित्सा कशा पद्धतीने करता येते हे साहित्याच्या आधुनिक प्रवाहांच्या उदाहरणांसह स्पष्ट केले आहे.

(folk typal criticism) is published by Nitin Publication, Pune. It discusses the concept of Folk Typal Criticism and the examples of the Folk Typal Criticism about the modern in flows Marathi literature.

डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांची साहित्य सेवेची सुरुवात कवितालेखनानेच झाली. 1994 पर्यंतच्या त्यांच्या कविता ‘आव्हान’ या गाजलेल्या कवितासंग्रहात समाविष्ट आहेत. त्यानंतर त्यांची प्रेमकविता ‘प्रिया’ या कवितासंग्रहात तर चिंतनगर्भकविता ‘कोऽहम’ या कवितासंग्रहामध्ये 2006 मध्ये प्रसिद्ध झाली. या दोन्ही संग्रहांचे संपादन डॉ. संगीता शेळके-मरकड यांनी केले आहे. अलिकडील कविता ‘मानसतरंग’ या संग्रहात 2011 साली प्रसिद्ध झाली. त्यांचे कवितालेखन कवितेच्या जुन्या नव्या सर्व प्रकारात दिसते. ‘मनमेघारे’ नावाची ऑडिओ सीडी 2013 मध्ये श्री. मकरंद खरवंडीकर आणि प्रा.डॉ.सौ. धनश्री खरवंडीकर यांच्या आवाजात व संगीत दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाली. यांत, तबला-श्री. हर्षद भावे, ढोलकी/तबला- श्री. अजित गुंदेचा, सिंथेसायझर- श्री. दिलावर आणि ऑक्टोपॅड- श्री. अजय साळवे यांची साथ मिळाली आहे. ध्वनिमुद्रण- ड्रीम्स म्युझिक स्टुडिओ मध्ये झाले. ‘अगस्त्य महात्म्य’ ही ओवीबद्ध पोथी अर्थात कथागीत 937 ओव्यांचे असून ते 2008 मध्ये प्रसिद्ध झाले. ‘अगस्ती देवस्थान ट्रस्ट, अकोले, अहमदनगर’ या संस्थेचे ते अधिकृत प्रकाशन आहे. या पोथीचे श्री. श्रीकांत फाटक यांनी समश्‍लोकी स्वरूपात कन्नडमध्ये रूपांतर केले आहे.

Dr. Sahasrabuddhe Anil started is writing with poem. The poems he written up to 1994 are collected in the collection named 'Avhan' which is well known. The love poems are collected in the collection 'Priya' and the poems deliver in his thinkings in all subjects are collected in collection 'Koham' Both the collections are edited by Dr. Sangita Shelke-Markad and Published in 2006. The poems up to 2011 are collected in the collection 'Manastarang'. The Audio C.D. is published in 2013. The 12 selected poem from all collections are sung in it by Shri Makarand Kharvandikar & Prof. Dr. Sau Dhanashri Kharvandikar. It has Music as under-Tabala- Shri Harshad Bhave, Dholki/Tabala- Shri. Ajit Gundecha, Sinthesiezar- Shri Dilavar Actopad- Shri Ajay Salave Recorded in Dreams Music Studio by Shri Ajay Salave 'Augustya Mahatmya' is the Pothi (Sacred- Book) written in Ovi form- 937 Ovies, is published in 2008. It is the Authentic Book Publication of 'Augustya Devasthan Trust, Akole, Ahmednagar'. Shri Shrikant Phatak translated the book in Ovi form in Kannad.

(स्फूर्ति प्रकाशन, नगर प्र.आ. 1994) यात गेय, मुक्तछंदात्मक, शलाका, कणिका, हायकू इ. स्वरूपात जीवनातील सर्व विषयांवर भाष्य करणार्‍या कविता आहेत. वेळोवेळी पूर्वप्रसिद्ध कविता यात समाविष्ट आहेत.

Sphurti Publication First Ed. 1994. Different forms of Poems such as Songs, Free Verse, Shalaka, Kanika , Hayku are collected in the collection. All the subjects from the life can be experienced in the poems.

(हेमंत प्रकाशन, नगर 2006) डॉ. संगीता शेळके-मरकड यांनी संपादित केलेल्या डॉ. सहस्रबुद्धे यांच्या 56 कवितांचा संग्रह. यात प्रियादर्शन, प्रीतीची याचना, प्रीतीचे तत्त्वज्ञान, प्रीतीची उत्कटता असे प्रेमभाव वृत्तीचे 4 पैलू विचारात घेऊन संपादन केले आहे. प्रियेतील कविता वाचताना, अनुभवताना एक विशिष्ट दृष्टी हवी असे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी मलपृष्ठावर शब्दांकित केले आहे ते असे- ‘प्रिया ही एक सुंदर मूर्त भावना आहे. नितळ, केवल, उत्कट अन् चिरंतन. श्रेय आणि प्रेम सारे एका ‘प्रिया’ शब्दात तुडुंब! प्रेम जीवनाचा सारांश. प्रिया ही मूर्त रूप. राधा ही संवेदना. तद्रुपता ही केवलानंद! प्रेमकविता मुराद भोगायची असते. सहानुभूतीने प्रिया कोण, हा बालिश प्रश्न मनात ठेवून.

Hemant Publication, Nagar 2006. Priya is collection of poems edited by Dr. Sangita Shelake-Markad. 56 Love Poems are collected in the Book. Appearance of the beloved, courtship, Philosophy of the love, Intence feelings of the love are the four moods, can be experienced in the four groups of the Poems. Love is the sinless, absolute, powerful and eternal feeling. Love is the success & Love is the life. It should be noted in mind before reading the poems. Love is the conclusion of life. Beloved is its Visual Form and The Radha-Character is the feeling of love. To be one with Radha is the devine pleasure.

(क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स, नगर 2011.) या कवितासंग्रहात ‘तरंग’, ‘रंग’ आणि ‘निःसंग’ अशा तीन भागात कविता मांडल्या आहेत. ‘तरंग’मध्ये गेय रचना, ‘रंग’मध्ये खेळकर रचना आणि ‘निःसंग’मध्ये मुक्तछंद रचना आल्या आहेत. सर्व कवितांची निर्मिती सर्वथा व्यवहार आणि परमार्थ यांशी चिंतनशील मग्नतेने भिडण्यातून झालेली आहे. यातील ऋतुरंगचे दृकश्राव्य स्वरूपात संगीतबद्ध सादरीकरण झाले आहे. महाराष्ट्र टाईम्समधून चर्चा झाली.

Creative Communications, Nagar 2011. In the collection of Poems, Poems are collected in three parts. The part are Taranga, Ranga & Nisanga. In the part Taranga there are Songs, In the parts Ranga Light Songs are Collected & in the part of Ninsanga the poems in the Muktchand are collected. All the poems express the feeling about Life Style in connected of Social, Cultural & Religious aspects with deep thinking about the Universe & Mankinds. The Rituranga are performed with music with Kathak based Dance by Kallyani Kamatkar.

(प्रकाशक सौ. उषा सहस्रबुद्धे 2008) सौ. उषा अनिल सहस्रबुद्घे यांनी सदर ग्रंथ 28 ऑगस्ट 2008 रोजी प्रसिद्ध केला. श्री ‘अगस्त्य महात्म्य’ हा अगस्त्य ऋषींविषयी महात्म्य कथन करणारा उपासनेसाठी लिहिलेला सात अध्यायांचा व एकूण 937 ओवी संख्या असलेला काव्यग्रंथ होय. शेवटी अगस्तीमहाराजांची आरतीही दिलेली आहे. हा ग्रंथ साक्षात्कारपूर्वक लिहिला गेल्याचे डॉ. सहस्रबुद्धे सांगतात. त्याविषयी ते लिहितात, ‘‘महर्षी अगस्त्यांचा साक्षात्कार झाला. ग्रंथरूपाने प्रकट करण्याची आज्ञा झाली. बुद्धिप्रामाण्यवादी मनात संभ्रम निर्माण झाला. प.पू. स्वामी गोविंदाचार्यगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे प.पू. पंडित श्री. किशोरजी व्यास) यांनी आशीर्वाद देऊन संभ्रमावस्था दूर करून महर्षी अगस्त्यांच्या आज्ञेनुसार ग्रंथलेखन करण्याची आज्ञा केली. त्यामुळे आत्मविश्वास बळावला आणि ‘अगस्त्य महात्म्य’ व ‘अगस्त्य’ हे ग्रंथ सिद्ध झाले.’’

(The Sacred Poem Book) Published by Sau Usha Sahasrabuddhe. 937 Ovi type poems orrate the Agastya Mahatmya. It is the trust that Agastya Rishi appeared in visiul form in front of Dr. Sahasrabuddle and asked/ordeded him to write Agastya Mahatmya.

डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी अनेक लघुनिबंध, प्रासंगिक स्फुटलेखन, ललित निबंधात्मक मालिका, वैचारिक निबंध इ. प्रकारचे विपुल लेखन केले आहे. यातील जवळपास सर्वच लेखन वर्तमानपत्रांतून वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. या लेखनांचे संग्रह ‘जनात आणि मनात’, ‘मनात आणि अवकाशात’ तसेच ‘स्पंदनशिल्पे’ सारख्या डॉ. राजू रिक्कल संपादित पुस्तकांत प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व लेखन अनुक्रम 2002, 2003 व 2009 मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतरही त्यांचे लेखन सातत्य आहे. त्यांचे लेखन विनोदी, उपहासगर्भ तसेच गंभीर स्वरूपाचे असते शिक्षण, संस्कृती, सामाजिक व राजकीय स्थितीगती, प्रबोधनात्मक अशा विषयांवर त्यांचे लेखन असते.

Dr. Sahasrabuddhe Anil wrote short easys and occassional writings in newspapers. He also wrote critical and short easytype, delevering his thoughts, comments on literature, Culture, Social aspects, ethics, aspects, political aspects, about good manners etc. He is writing continuingly. The collection of these writings are in books 'Janat Ani Manat' in 2002, 'Manat Ani Awakashat' in 2003. 'Spandan Shilpe' in 2009. It is edited by Dr. Raju Rikkal. His writing is humours, satirical as well as serious. He is writing continously after these books published.

(मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली प्र.आ. 2003) संतांची वचने नेहमीच प्रापंचिकांना प्रपंचात रमलेल्या मनासह अवकाशातील अध्यात्मिक चिरंतनत्वाचा स्पर्श घडवितात. चिंतनात्मक ललितलेख. मनात आणि अवकाशात, मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली प्र.आ. 2003. संतवचनोंके आधारपर चिंतनात्मक लेख संग्रह.

Morya Publication Pune/Dombivali 2000 First Ed. 2003. In this book there are short essays based on Saint's words - Abhangas - Cultural, Social & General discussion on the Saint's thoughts.

(मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली प्र.आ. 2002) संत, लोकधुरीण, कवी, लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञचिंतक, ऋषी-मुनी, तपस्वी आणि समाजसेवक आपल्या वागण्या-बोलण्यातून समाज घडविण्याचे कार्य करीत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत प्रेरणा मिळत असतात. चरित्रात्मक, चिंतनात्मक, ललित लेख.

Morya Publication, Pune/Dombivali First Ed. 2002. Scientists, Philosophers, Saints, Elderly people, Poets, Writers, Artists, Guide & lead the people - in all the ways. The short essays in this book mean it through the discussion.

(आनंदोत्सव प्रकाशन मंच, नगर 2009) प्रा.डॉ. राजू रिक्कल यांनी संपादित केला. प्रकाशाच्या वाटेवरील मनाच्या कवडशातून डॉ. सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या सुमारे पन्नासावर ललित गद्य लेखांचा हा संग्रह होय. लोकसत्ता, अहमदनगरमधील नगर वृत्तांतमध्ये 2008 मध्ये प्रतिसप्ताह ‘कडवसे’ या सदरात प्रसिद्ध झालेले हे लेख आहेत. अनुभवास आलेल्या, येणार्‍या आणि येऊ घातलेल्या घटना, प्रसंग, व्यक्ती, विचार यावर डॉ. सहस्रबुद्धे यांच्या मनात उमटलेल्या प्रतिक्रिया संवेदनशीलतेने, कधी खेळकरपणाने तर कधी मिश्कीलपणाने, कधी खंत व्यक्त करण्याच्या निमित्ताने तर कधी प्रबोधकतेने या ललित गद्यरेखा आल्या आहेत. आणि निबंधांचा हा संग्रह सदर वाचकांच्या आग्रहानुसार व लोकसत्ता दैनिकाच्या सहकार्याने सर्व रसिकांसाठी ग्रंथरूपाने प्रसिद्ध होत आहे.

Anandostav Prakashan Manch, Nagar 2009. More than fifty short essays in the series 'Kawadse' in Loksatta Daily are collected in this book. This book is editted by Dr. Raju Rikkal. The short essays are the suggestive, playful and thinkful reactions and remarks in the mind of Dr. Sahasrabuddhe.

‘लोकनिष्ठ अध्यात्मवाद’ ही अध्यात्म क्षेत्रातील संशोधित संकल्पना मांडून त्यावर लिखित परिसंवादासह चर्चापूर्वक ग्रंथ मांडणी केली. ‘लोकधर्म’ हे भारतीय लोकसारणीविषयक चिंतन मांडणारे पुस्तक झाले. ‘पुरुषार्थ’ हे पुस्तक भारतीय परंपरेतील पुरुषार्थ संकल्पना स्पष्ट करते. ‘आदिमांचे वर्तमान’ आदिवासींविषयीचे ते चिंतन आहे.

'Lokanishtha Adhyatmavad' is the book in which introduces the new concept by researching concepts in the area of metaphysics. The book is written with the written conference participated by thinkers in Maharashtra. The book 'Lokdharma' thinks about the Folk religion of India. 'Purushartha' thinks about the concept Purusharth- The real personality of the Indian. 'Aadimanche Vartman' thinks about the Scheduled Tribes in modern age relevance.

ज्ञानाचा, वैश्विक जीव आणि वस्तुमात्रांच्या कल्याणाच्या दृष्टीने श्रद्धा आणि प्रेमपूर्वक विनियोग करून; मानवी विकास आणि कल्याण साधण्याचा विचार म्हणजे लोकनिष्ठ अध्यात्मवाद होय. मानवी जीवन हे निसर्गतःच अपरिहार्यपणे संघनिष्ठ जीवन आहे. ‘लोक’चे अस्तित्व मानून लोकधारणात्मकतेने जगण्याचा म्हणजेच लोकबंधात्मकतेने (विष्णूतत्त्वाने) जगण्याचा प्रयत्न मानवीसमूह करीत असतात. लोकधुरीण एकप्रकारे विष्णूतत्त्वाने अर्थात ‘लोकबंध’चे स्वरूपात कार्यरत असतात, म्हणूनच त्यांच्या वर्तनातील, मार्गदर्शनातील ‘लोकनिष्ठ अध्यात्मवाद’ ही भूमिका सर्वांनी समजून घेतली; तर अंधता, वितंड आणि पाखांड विचार नाहीसे होतील आणि सहानुभूतीपूर्वक निष्काम कर्मयोगी पुरुषार्थ जागवला जाईल, असा प्रयत्न, या पुस्तकात तात्त्विक चर्चा करून केला आहे.

Loknishtha Adhyatmavad that is Metaphysics-ism for Universal being. It means the love for Universal being should be noted in the behaviour of mankind. Life of the man is naturally a collective behaviour with collective mind. People on the earth always try to live collectively, lovingly and happily together. The base of their living is love or the motifs or motifs of Metaphysics delivered by their heroes of the groups. Everybody can realize that the fundamental doctrines of any religion teach to love each other and to behave creatively to experience divine pleasure in mankind. This behaviour can wave all the sinfulness in the life of mankind. This book explains this theologically.

लोकधर्माला पोथीनिष्ठा किंवा चौकटीत, त्रिकोणात, वर्तुळात, जेरबंद झालेली लोकसारणी, ही दुर्धर व्याधी वाटते. लोकधर्म हा नित्य नूतन, नित्य वर्तमान म्हणूनच निसर्गतः गतीशील असतो. म्हणजेच तो सनातन असतो. जगाच्या भूत, वर्तमान आणि (भविष्यातही नक्कीच) भारतीय सनातन धर्म हाच एकमेव धर्म असा आहे असे हा ग्रंथ विचार मंडन करतो. प्रकाशक ः आनंदोत्सव प्रकाशन मंच, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदनगर, प्र.आ. 24 ऑगस्ट 2016, मूल्य 50/-.

Lokdharma do not follow any priscribed theory book of any religion. It is natural functioning religion to live happily and lovingly collectively. We can see the doctrines of existing religions in Lokdharma because the religions are designed from Lokdharma and they are merged in Lokdharma. Lokdharma and they are merged in Lokdharma. Lokdharma is the continouous process of collective behaviour of manking from the existance of Universe. So Lokdharma is always a present religious expression on mankind. Bharatiya Sanatan Dharma is the only religion which can be realized as Lokdharma.

ज्हौशी रंगभूमीवर नट आणि दिग्दर्शक म्हणून जवळपास 25 नाटकांत कामे केलेल्या डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘भरारी अन् भानगडी’ आणि (अपत्य) ‘संभव असंभव’ अशी दोनच नाटके लिहिली आहेत. ही दोन्ही नाटके सामाजिक व राजकीय स्थितीगती संदर्भात समस्याप्रधान आहेत. दोन्ही नाटके प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर होण्याच्या तयारीने मांडणी केली आहेत. ‘कातळी निखारे’ ही एकमेव एकांकिका डॉ. सहस्रबुद्धे यांच्या नावावर असून ही एकांकिका आदिवासींनी केलेल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामावरील ऐतिहासिक स्वरुपाची आहे.

As a hobby Dr. Sahasrabuddhe participated the local artists group and worked as an actor & director near about twenty five plays. The two plays, 'Bharari Ani Bhangadi' and 'Sambhav Asambhav' were written by him. Both the plays discuss social & political etc. problems. Both the plays are plotted for to be performed on the experimental & Business theatre. The only One act play 'Katali Nikhare' is based on the theme of Bharatiy Freedom Fight by Scheduled tribes.

ज्(नंदा प्रकाशन, विक्रोळी प्र.आ. 2001) बेकारीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करते आहे. अनाचार, दंभाचार आणि भ्रष्टाचार यांचे प्राबल्य माजले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात यात सतत वाढ होते आहे. तरुणांना नाईलाजाने या सर्व परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. तरुण आपल्या मनातील चांगुलपण, स्वत्व राखण्याचा प्रयत्न करीत धैर्याने या परिस्थितीवर मात करीत आहेत. फार्सिकल, रहस्यमय कॉमेडीच्या स्वरूपात हा आशय भरारी अन् भानगडीतून व्यक्त होतो.

Nanda Publication Vikroli. First Ed. 2001. Everyday the problem of unemployment is becoming difficult. Unethical behavious, Pretendings & Corruption is becoming stronger and stronger. The Youth has to face the problem. They have no other go. Facing it yet they are trying to control themselves and trying to hold their character. This is the subject of the Drama. It is Farcical, Ditective, Comedy.

(प्रीती प्रकाशन, पुणे प्र.आ. 2002) जनन प्रक्रिया ही नैसर्गिक प्रेरणा, अपत्य प्राप्तीची दुर्दम्य लालसा ही या प्रेरणेचे स्वाभाविक फलित यातूनच वैज्ञानिक प्रगतीच्या युगात जनुक विकास, टेस्ट ट्यूब बेबी, डोनर्स सेक्ल सेल यांच्या सहाय्याने वंधत्वावर, निपुत्रिकपणावर मात करण्याच्या कल्पनेने मध्यमवर्गीय, भारतीय सांस्कृतिक कोषातून वाढलेल्या दाम्पत्याच्या जीवनात अवतरलेले गंभीर, समस्याप्रधान भारतीय शोकनाट्य.

Priti Publication, Pune. First Ed. 2002. Sex process & the issuing child is the natural thing. In this age of Science one can overcome the problem of non-issuing by genetic development. Test Tube Baby, Donors Sex Sell. It is shown in the tragedy drama.

(मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली प्र.आ. 2003) भंडारदरा परिसरातील रत्नगड महालात गोविंद खाडे आणि रामजी भांगरे या महादेवकोळी आदिवासींनी कॅ. माकिनटोशशी एका तोफेच्या बळावर पंधरा दिवस लढत दिली. या संग्रामावर आधारित ऐतिहासिक आणि उदात्त शोकात्म एकांकिका. वाङ्मयेतिहासात डॉ. तुमराम यांनी विशेष लक्ष वेधले आहे.

The leaders of Shedual Tribes Mahadev Koli- Govind Khade & Ramji Bhangare fought the Cap. Makintosh for Fifteen days with the only Gun (Tof). The battle field was Sahyadri range - Ratnagad area where the Bhandardara Dam (The Willson Dam) is situated now. The one act play is written on the historical fight. Dr. Vinayak Tumram wrote very highly about is in the history of Adivasi Sahitya the part it of The History of Marathi literature published by Maharashtra Sahitya Parishad, Pune.

‘इंडियन फ्रायडूच्या चंद्री आणि इतर कथा’, ‘कारव’, ‘विलक्षण’ आणि ‘नारद ब्रेकींग न्यूज’ असे मोजकेच 4 कथासंग्रह डॉ. सहस्रबुद्धे यांच्या नावावर असून नवकथा, गंभीर सामाजिक राजकीय, सांस्कृतिक आणि कृषी आणि विज्ञानविषयक प्रश्नांना कधी गंभीर, विनोदी तर कधी उपरोधिक पद्धतीने या कथा प्रश्नांची मांडणी करतांना ही लोकरंजन करतात.

'Indian Fraiduchya Chandri Aani Itar Katha', 'Karav', 'Vilakshan' and 'Narad Breaking News' are the Story books written by Dr. Sahasrabuddhe unfold the Social, Cultural, Political about Farming & Science problems through his short stories. The stories discuss the mental and moral complexes of the mankind. He writes the stories in homourus and satirical way.

(क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स, नगर, प्र.आ. 2001) कामवासना ही मूलभूत नैसर्गिक प्रेरणा. मैथून हा मुलभूत विकार. अवघं प्राणीजीवन जननप्रक्रियेच्या संवेदनेनं प्रेरीत झालेल असते है नैसर्गिक सत्य. नर आणि मादी दोनच अस्तित्वे सत्य होत. समाज, संस्कृती आदि काल्पनिकतेतून उद्भवलेल्या भावविश्वाच्या पलीकडे माणसाला संभोग वासनेकडे खेचून नेणारे उघड सत्य - उत्तान शृंगारिक कथांमधून भावना, वासना चाळविणार्‍या पेटविणार्‍या या कथांमधून; भारतीय सांस्कृतिक कोषामुळे या मूलभूत प्राणीतत्त्वाला कितपत आकळले जाते याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावण्याचा प्रयत्न चटकदार कथा करतात.

Creative Communications, Nagar. First Ed. 2001. Sex is the instinct of lives. Sex appeal Courtship & the Sex deed are natural feeling of mankind. All the liveliness in the world is sensetive of the Sex. This truth takes mankind far away from the Cultural, Social ethics. In the Sex affairs every one can forget all the Cultural and Social or religious ethical aspects Those hot stories compels the reader to think, if the Indian Cultural, Social and religious ethical traditions can control the otherwise Sex affaris.

(मोरया प्रकाशन, पुणे/डोंबिवली प्र.आ. 2002) सांस्कृतिक भावविश्वाधारे मनात उचंबळणार्‍या भावविश्वातून अनेक प्रश्न, समस्या मानवी मनाला व्यापून तीव्र भावनिक संघर्ष उभा करतात. मानवी जीवनात हे संघर्षाचे कारव सतत सुरूच असते. रंजक, उत्कट कथांतून हा मानसिक व प्रसंगी भौतिक संघर्ष चित्रित झाला आहे.

Moraya Publication, Dombivali/Pune. First Ed. 2002. So various problems or tasks occur in the mind from the cultural & religious traditions, So as from Political & Social traditions and affairs. The problem disturbs or destorys the mind of man. The stories in this book takes reader to think of the problems in attractive way.

(प्रीती प्रकाशन, पुणे प्र.आ. 2002)मानवी जीवनातील विसंगतीवर गंमतीशीरपणे प्रकाश टाकणार्‍या चटकदार विनोदी कथा.

Priti Publication, Pune. First Ed. 2002. Cortradictory, unhealthy, misdeeds and fantasies in Social or Cultural life is broken out in those humorous and satirical stories.

(पद्मगंधा प्रकाशन, पुणे 2012.) शास्त्रीय प्रयोग, नैसर्गिक व राजकीय घडामोडी यांचा जागतिक पातळीवर घडू पाहणार्‍या परिणामांची दखल भारतीय परंपरेत आणि भारतीय दैवतकथा परंपरेत कोणत्या प्रकारे घेतली जाऊ शकेल यावर प्रकाश टाकत भारतीय तत्त्वज्ञान, ब्रह्मशक्ती यांच्या शाश्वत अस्तित्वाविषयी श्रद्धा यांची चर्चा या विस्मयकारक कथांतून नारद या कथानायकाधारे केली आहे.

Padmgandha Publication, Pune. First Ed. 2012. Research & Experiments in Science, The miraculous & Exceptional instances and affairs in nature and the Political affairs affect the life of the world. How they affect the cultural life of Indians and how they can be received by the Indian Mythological characters. The fantasies by the character Narad discusses humorously the subject.

‘चाळीसगाव डांगाणी’ या प्रबंधात्मक ग्रंथाच्या निमित्ताने लोकवाङ्मयाची समीक्षा व लोकवाङ्मय विषयक निर्मिती विचार घडला. ‘लोकसाहित्य विचार’ असे पुस्तक आले. ‘ज्ञानेश्वरीतील साहित्यविचार’ हा साहित्यशास्त्राची चर्चा करणारा ग्रंथ झाला. ‘प्रस्तावना ः स्वरूप आणि संकल्पना’, ‘समीक्षा ः प्रयोजन आणि कार्य’, ‘लोकबंधात्मक चिकित्सा’, ‘साहित्याची समग्रता’ अशी पुस्तके झाली. परतत्त्व स्पर्शवाद, लोकबंधात्मक चिकित्सा, मिथक, प्रवृत्ती, अशा काही स्वतंत्र संकल्पना हे समीक्षा क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान होय.

'Lok-Sahitya Vichar' is the book which discusses about the criticism of folk-Lore. 'Dnyaneswaritil Sahityavichar', 'Prastavana; Swarup Aani sancalpana', Samikha: Prayojan Aani Karya', 'Lokbandhatmak-Chikista' and Sahityachi Samagrata are published books in this area. Partatvasparsh vada, Lokbandhatmak-Chikitsa and Mithak Pravritti is his contribution to the Literary Criticism.

(पद्मगंधा प्रकाशन, पुणे 29 डिसेंबर 2006) हा प्रस्तावना लेखन याविषयी सैद्धांतिक व प्रायोगिक स्वरूपात माहिती देणारा ग्रंथ, पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी 29 डिसेंबर 2006 रोजी प्रसिद्ध केला. प्रस्तावनांचा वाङ्मयप्रकार म्हणून विचार प्रस्तावनालेखन प्रकाराची संकल्पना, स्वरूप आणि आवश्यक ग्रंथकारांचे प्रस्तावनालेखन, प्रस्तावना लेखकाची भूमिका व व्यक्तिमत्त्व, प्रस्तावना आणि समीक्षा, प्रस्तावना आणि संशोधन, प्रस्तावना लेखकाने पाळावयाची पथ्ये, प्रस्तावना लेखनातील अडचणी याविषयी या ग्रंथात चर्चा केली आहे व लेखकाने विविध ग्रंथांना दिलेल्या प्रस्तावना ग्रथित केल्या आहेत. प्रस्तावना या विषयावर मराठीत बहुधा स्वतंत्र असा हा एकमेव ग्रंथ आहे, असे म्हणता येईल.

Padmagandha Publication, Pune 29 Dec. 2006. The book discusses the Preamble, Preface, Introduction, Forwarding to the book. It discusses the concept of it & how to write it, What is its important, Who can write it etc. It also discusses the difficulties in writing and the discipline to write it.

समीक्षा प्रयोजन आणि कार्य हा ग्रंथ दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे यांनी 2008 मध्ये प्रसिद्ध केला आहे. पत्रकार, मराठी विषयाचे प्राध्यापक विद्यार्थी आणि अभ्यासक यासर्वांसाठी उपयुक्त असलेल्या या ग्रंथात समीक्षा प्रयोजन आणि या पहिल्या भागात साहित्य, साहित्य प्रकार समीक्षा, समीक्षेची प्रयोजने, समीक्षेची कार्ये, समीक्षा परिणाम याविषयी सैद्धांतिक चर्चा केलेली असून, दुसर्‍या भागात लेखकाने केलेल्या समीक्षात्मक लेखनाची उदाहरणे ग्रथित केली आहेत. समीक्षा प्रयोजन आणि कार्य याविषयी स्वतंत्रपणे विचार करणारा हा ग्रंथ आहे.

Dastane Ramchandra & Co., Pune. The book is useful for the Journalists, Teachers, Professors & the Students. Aims and aspects of the Criticism are discussed in the book. Concepts & kinds of the Criticism are also discussed here. The examples of the Criticism writings are there in the book.